⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल; कानळद्यातील सभेत गुलाबराव पाटील यांचा विश्वास

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल; कानळद्यातील सभेत गुलाबराव पाटील यांचा विश्वास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गुलाबराव पाटील यांनी विकासकामांची यादी मांडत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. “मी चौथी निवडणूक लढतोय. विकासावर बोलायला विरोधकांची हिंमत होत नाही. मी नेहमी सर्वसामान्य व गरिबांच्या पाठीशी उभा राहिलोय. गिरणा नदीवर बंधारा बांधून दाखवणारच हे माझं पुढचं व्हिजन आहे . हिंदु-मुस्लीम ऐक्य जपून मी सर्वसामान्यांसाठी काम केलं. “जनतेच्या प्रेमानेच मी इथपर्यंत पोहोचलोय. विकास हीच माझी जात असून “जाती-पातीच्या राजकारणा पेक्षा विकासासाच मोठा विजय होईल असा ठाम विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त करत येत्या 20 तारखेला धनुष्य बाणाला जास्तीत जास्त मतदान करून मला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार सभेला कानळदा गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विरोधकांवर घणाघाती टीका करताना संजय पवार यांनी विरोधकांच्या जाती – पातीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “गुलाबराव पाटील हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. जातीच्या नावावर मतं मागणाऱ्यांना विचारावं, त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं ? 25 वर्षे सत्ता उपभोगली, पण किती लोकांचं भलं केलं ? गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही जातीचं लेबल न लावता काम केलं आहे. ते विकासाचं प्रतीक आहे .”

माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. “गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. रस्ते, पूल, शिक्षण, महिलांसाठी योजना यात सगळ्यांत त्यांचं मोठं योगदान आहे. विरोधक भूलथापा देतायेत, पण कानळदा व परिसरातील समाज बांधव व ग्रामस्थांनी गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावे ,” असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजेंद्र चव्हाण, सुभाष अण्णा पाटील, संजय पाटील सर, मुकुंदराव नन्नवरे, निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून गुलाब भाऊंना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी रॉ. का. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राजेंद्र चव्हाण, चंद्रशेखर अत्तरदे, पवन सोनवणे, संजय पाटील सर, राजेंद्र चव्हाण, सरपंच पुंडलिक सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, शिवराज पाटील, गोपाल जीभाऊ डी.जी.पाटील, लाला सर, गोपाळ भंगाळे, राजू सोनवणे, मनोज पाटील सर, बापू सिताराम, अनिल भोळे , पी. एम. पाटील सर, समाधान पाटील, वसंत भालेराव, संजय भोळे, मुरलीधर अण्णा, भरत बोरसे, ब्रिजजलाल पाटील, विजुभाऊ साळुंखे , कैलास चौधरी, दिलीप आगीवाल, अरुण सोनवणे, अण्णा सपकाळे, रमेश आप्पा पाटील, संदीप पाटील, मोनाली पवार, ज्योतीताई चव्हाण, भारतीताई , दिनेश जैन, राजू साळुंखे सर्व ह. भ. प. गजानन महाराज वरसाडेकर, आवारकर महाराज , सुशील महाराज, समाधान महाराज भोजेकर, श्याम महाराज शास्त्री, हिरामण तात्या महाराज, विठ्ठल महाराज आडगावकर, संदीप महाराज यांच्यासह कानळदा व परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.