जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । काही लोक म्हणायचे गुलाबराव पाटील संपला पण आता त्यांचं त्याच लोकांनी खाली पाण्यात पाहावे आणि पहावे पाण्यात काय संपलंय आणि काय वाहिलंय. अश्या शब्दात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर घणाघात केला.
मोठ्या जल्लोषात जळगावात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा स्वागत करण्यात आलं. यावेळी हे शक्तीप्रदर्शन आहे असे विरोधक म्हणत होते. मात्र हे शक्ती प्रदर्शन नाही, प्रेम आहे. मी काही लोकांना निमंत्रण दिलेलं नाही. लोकांनी आशीर्वाद दिले आहेत. अश्या शब्दात गुलाबराव पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले कि, आशीर्वाद सर्वात महत्त्वाचे असतात. लोकं म्हणायचे कि गुलाबराव पाटील संपला पण आता त्यांचं त्याच लोकांनी खाली पाण्यात पाहावे आणि पहावे पाण्यात काय संपलंय आणि काय वाहिलंय.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांची प्रथमच जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. चोपडी कोंडव्हाय फाटा येथे प्रचंड आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत झाले.
ना. गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्यांना मंत्रीपदाची तर दुसर्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आज शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी ते जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याचा दौरा अधिकृतपणे जाहीर होताच त्यांच्या अभूतपुर्व स्वागताचे नियोजन करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडी कोंडव्हाय फाटा येथे त्यांची जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी ना. गुलाबराव पाटील यांचा स्वागत केले.