---Advertisement---
धरणगाव राजकारण

गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट म्हणाले, १२ खासदारांसह २० माजी आमदार संपर्कात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) मंगळवारी रात्री प्रथमच आपल्या पाळधी येथील निवासस्थानी परतले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

gulabrao patil 2 jpg webp

दरम्यान, ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं होते. शिंदे यांना शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यात गुलाबराव पाटील यांचा देखील समावेश होता. शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार आपल्या घरी काल पहिल्यांदा पोहोचले आहे.

---Advertisement---

आमदार गुलाबराव पाटील देखील मंगळवारी रात्री प्रथमच आपल्या पाळधी येथील निवासस्थानी परतले. यावेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

तसेच शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---