जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंबरनाथ येथे दौऱ्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली. यावेळी त्यांनी प्रतिमा पूजन केले. अंबरनाथ येथे शिंदे गटाचे नेते तथा अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. याचबरोबर या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक रविंद्र पाटील, उमेश गुंजाळ, रवी करंजुले, उत्तर भारतीय सेनेचे शहर अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे, उद्योजक गुणवंत खेरोदिया, बाळासाहेबांची शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो !, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ! अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता