⁠ 
बुधवार, मे 8, 2024

गुलाबराव, बेबरवशाचे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

“मी पाळधी येथे पानटपरी चालवत असे. दादागिरी,टग्गेगिरी करीत होतो. मा.बाळासाहेब ठाकरे यांना टग्गेगिरी आवडली.त्यांनी आम्हाला अलगद उचलले आणि आमदार बनवले.आणि आता मा.उद्धव ठाकरे साहेबांनी याच गुणांची कदर करून मला मंत्री बनवले.जितके उपकार आईबापाने केले नाहीत त्यापेक्षा जास्त उपकार बाळासाहेब व उद्धवसाहेबांनी केले आहेत.म्हणून बाळासाहेब मला बापाच्या जागी आहेत.मी कधीही बाप बदलणार नाही.कधीही पक्ष बदलणार नाही” हे वाक्य कोणी कोणाला बोलले,असे एमपीएससी, युपीएससी परीक्षेत विचारले तर परीक्षार्थी पटकन टिकमार करतील,पाळधीचे गुलाबराव पाटील यांनी सभेत बोलले होते.
आणि हेच गुलाबराव दोनच दिवसात गुवाहाटी पळाले.उद़्व ठाकरेंना काय वाटले असेल?हा माणूस काल परवाच बाळासाहेबांना बापासारखा समजत होता आणि आज मला सोडून पळून गेला.बाळासाहेबांनी यांना आमदार बनवले.मी मंत्री बनवले,तरीही मला सोडून पळाला.गुलाबरावाने शिवसेना नाही सोडली, बाळासाहेब आणि उद्धवसाहेब यांना सोडले.ठाकरी भाषेत याला गद्दारी म्हणतात.आमच्या खानदेशी भाषेत बिनभरवशाचा पेंद्या म्हणतात.वऱ्हाडी भाषेत बिनबुडाचा गडू म्हणतात.पुणेरी भाषेत लोटा म्हणतात.विदर्भ भाषेत नर्मदेचा गोटा म्हणतात.

गुलाबराव पाटील सांगतात कि मला उद्धव ठाकरे साहेब भेटत नव्हते.तरीही मी भेटून सांगितले कि,पळून जाणाऱ्यांना थांबवा.उद्धव ठाकरे साहेब म्हणाले,ज्याला जायचे असेल त्याने निघून जावे.अशा तळ्यात मळ्यातील लोकांची मला गरज नाही.म्हणून पळून गेलो म्हणे.हे काही कारण झाले ?उद्या मुलाने म्हटले कि मी तुम्हाला सोडून जातो,आणि बापाने त्रागा करून सांगितले कि तुला पटेल ते कर.तर मुलगा एसटी पकडून गुवाहाटी पळून जाऊ शकतो का?तीस वर्षाचा संबंध, ऋणानुबंध गुलाबराव पाटलांनी एका दिवसात तहसनहस करून टाकला.म्हणून सेनावाले ,उघड्या तोंडाचे, त्यांना वारंवार गद्दार म्हणतात.मी म्हणतो गुलाबराव बेभरवशाचा माणूस आहे.
माझा अनुभव यापेक्षा वाईट आहे.मी गुलाबराव पाटलांना आमदारकी किंवा मंत्री पद दिले नाही.आणि मत ही दिले नाही. मी जळगाव वाघनगरमधे राहातो.वीस हजार लोकवस्तीचे गांव.गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ.धारावी पेक्षा थोढी सुधारीत झोपडपट्टी.आमचे लोक सभेत कमी ,भंडाराला जास्त जमतात.एकही रस्ता पक्का नाही.म्हणून सकाळीच सात वाजता गुलाबराव पाटलांच्या पाळधी मुक्कामी गाठले.आम्हाला एकतरी रस्ता बनवून द्या.झेडपी किंवा डीपीडीसीच्या निधीतून.तुमचे घर किंवा शेत विकून नका बनवू.तर गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही मला काय दिले? तुम्ही माझ्यावर काय उपकार केले?असे फुकट रस्ते मिळत नाहीत.तुम्ही रस्त्याचे मोजमाप करतात.त्यामुळे माझ्या मादीतील ठेकेदार ठेका घेत नाहीत.मी पण त्यांच्यासारखाच फटकळ माणूस.भाऊ तुम्हाला काय देऊ?बाटली,बाई कि पैसा? भाऊंचा चेहरा गोरामोरा झाला.सकाळी सकाळी घाम फुटला.

ही बातमी तेथे बसलेल्या खबरीने जळगाव लोकमत ला कळवली.त्यांनी शहानिशा केली.भाऊ ,आज तुमची आणि शिवराम पाटलांची झमकली म्हणे.तेव्हा ,भाऊंनी उत्तर दिले .”हा माणूस माझ्या घरी येऊन शिव्या देऊन गेला.”अशीच हेडलाईन लोकमतने छापली.खरे म्हणजे मी विनंती अर्ज घेऊन गेलो होतो.पण भाऊंना ते नको.दुसरेच काहीतरी हवे होते.तर मग,विचारून घ्यावे.कोणत्या देवाला कोणता नैवेद्य आवडतो,हे आम्हाला,गावठी घेणाऱ्याला चांगले कळते.खडसे महाराज ,असे विचारत नाहीत.ते शेवटचा एपीसोड दाखवतात.सीडी.

खडसेंचे साम्राज्य ढासळले.भोसरी प्रकरणात ते अडचणीत आले.गुलाबराव पाटलांना संधी चालून आली.भाऊंना पालकमंत्री बनवले.यात उद्धव ठाकरेंचा हेतू वाईटच होता.जळगांव जिल्ह्यात शिवसेनेत सभ्य आमदार , चिमणराव पाटील, किशोर पाटील उपलब्ध असतांना ही अवदसा आठवली.रेती माती राशन दारू.सात नंतर हाणू कि मारू. ठाकरेंनी घोडे सोडून गधे तांग्याला जुंपले.उकिरडा पाहून गधे उलटे झाले.तांगा उलटा आणि गधे फरार.
कोरोना रोगराई काळात पालकमंत्री ने चांगलाच हात धुवून घेतला.मतदार मेले तरी चालतील पण मलिदा मिळवला.जळगांव च्या सिव्हिल सर्जन ने अधिकृत पत्र दिले‌.कोरोना काळातील खोटी खरेदी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याच सुचनेनुसार केली आहे.या अपहारास तेच जबाबदार आहेत.आम्ही इत्यंभूत कागदोपत्री माहिती घेऊन, आमदार चिमणराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिली‌.भाऊंचे व्याही गिरीश महाजन यांना दिली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना ही दिली.पण या अपहाराला या सर्वांची सम्मती होती.कमाईतून कोणाला किती वाटा मिळाला,ते नंतर कळेलच.या पापाला जबाबदार एकटे शिंदे नव्हे ठाकरे सुद्धा आहेतच.राष्ट्रवादीचा तर तो धंदाच आहे.भाजपचे रक्ताचे नाते आहे.आहे कोण इमानदार? तू चोर ,मी चोर.सब चोरोका मेला.एक था शरीफ ,वो भी चोरोका चेला.

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.