⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

पालकमंत्री गुलाबराव पाटीलांची शहीद जवान वैभव वाघ यांच्या घरी सांत्वनपर भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे कार्यरत असलेले भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वैभव सुनील वाघ यांचे कर्तव्यावर असताना बोट पलटी होऊन सुगाव बु.(जि. अहमदनगर) येथे या दुर्देवी अपघातात 23 मे रोजी शहीद झाले. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पांढरद येथे जाऊन त्यांच्या कुंटुंबियांची भेट घेवून त्यांना धीर दिला. यावेळी सोबत आमदार किशोर आप्पा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भुराआप्पा पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, युवराज पाटील उपस्थित होते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे. यांची टीम 22 में रोजी गट मुख्यालय धुळे येथुन सुगाव बु. तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे शोध व बचाव कार्य करण्यासाठी गेली होती. दि. 23 में रोजी सकाळी शोध व बचाव कार्य दरम्यान या टीमची त्बोट पलटी झाली त्यात तीन जवान कर्तव्यावर असताना यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल संकटाच्या काळी धावून जाणारे पूर्ण प्रशिक्षित जवान असतात.

पण दुर्देवाने अशी घटना घडली त्यात जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील हा जवान शहीद झाला, त्यामुळे घराचा मोठा आधार गेला. या कुटुंबाचे दुःख मोठे आहे. शासनाकडून अशावेळी दिली जाणारी मदत तात्काळ दिली जाईल असे सांगून आपण वाघ कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविली.