⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी अभिवादन केले आहे.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक तुकाराम हुळवले, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार रविंद्र मोरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.