स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जून 24, 2024 1:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । देशाच्या एकतेसाठी झटणारे नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

shama prasad mukharji death anniversary

भारतीय जनता पार्टी जळगाव लोकसभा निवडणूक समीक्षा बैठक ब्राह्मण सभा जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सर्वप्रथम स्व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, प्रदेश सचिव अजय भोळे, माजी खासदार ए.टी.नाना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, भार्गवीताई पाटील, विजयाताई गवळी, देवयानीताई ठाकरे, रवी पाटील, हिरालाल पाटील, एड. सी.आर.पाटील, (अमळनेर) कैलास पाटील, मुकुंदा चौधरी, धीरज महाजन, राहुल वाघ, राजू मराठे, माजी सैनिक डी.एम.बडगुजर, भैरवी वाघ- पलांडे आदींची उपस्थिती होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now