---Advertisement---
जळगाव जिल्हा

आज मल्हार हेल्प फेअर -४ चे भव्य उद्घाटन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ सेवाकार्याचा मेळावा चे आज सायंकाळी ६ वा. भव्य उद्घाटन पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटिल यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या वर्षी हेल्प फेअर मध्ये नवीन संकल्पनांना समाविष्ट करण्यात आले आहे . स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच या वर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, करमणूक आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात आली आहे.

help 1 jpg webp


हेल्प फेअर हा असा सोहळा आहे जिथे विविध सेवाभावी संस्था , गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.

---Advertisement---

या वर्षी स्थानिक लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी संस्थांना महाराष्ट्रातून हेल्प फेअर – ४ मध्ये आमंत्रित करण्यात आले असून त्यांत प्रामुख्याने मुंबई, पुणे , धुळे, नंदुरबार येथील संस्थांचा समावेश आहे.

विद्यार्थी मित्रांसाठी या वर्षी हेल्प फेअरमध्ये विविध विषयांवरील देखावे साकारण्यात येत असून. या माध्यमातून अपंग, अंध आणि गरीब -होतकरू मुलांच्या कलांचे सादरीकरण केले जाईल. मुलांतील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘हॉबी डूबी डू’ या विशेष विभागाचे समायोजन येथे करण्यात आले आहे, ज्यात स्पोर्ट्स , डान्स, आर्ट , म्युझिक यासारख्या छंद वर्गांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे.

विविध स्तरांवर, समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या व्यक्तींना सेवामहर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील १० पुरस्कार आज वितरित केले जातील. मान्यवरांची व्याख्यानेही दररोज असतील. बचत गटांना उत्पन्न मिळावे आणि प्रदर्शनात आलेल्यांना जत्रेची मजा चाखता यावी, यासाठी हेल्प फेअरमध्ये विविध बचत गटांचे, खान्देशी पदार्थांचे स्टॉल्सही लावले जातील. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी तीनही दिवस असेल.

प्रत्येक स्टॉलवर आपण त्या संस्थेच्या कार्याशी कसे जुळू शकतो, पैशा शिवायही आपण त्यांना काय देऊ शकतो, याबाबतची माहिती मिळेल. जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यांचे आवडते कार्य करणाऱ्या संस्थेशी आपल्या परिस्थितीनुसार जुडू शकेल. आणि या योगे एक आनंदाची, समाधानाची अनुभूती मिळवेल .

जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनात यावे आणि एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअरचे सदस्य श्री आनंद मल्हारा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

आजच्या प्रमुख वक्त्या श्रीमती कांचनताई परुळेकर असून स्वयंसेवी संस्थांची सामाजिक उद्योजकता या विषयावर त्या मार्गदर्शन करतील.

सेवामहर्षी आणि सेवादूत पुरस्कार वितरण सोहळा :
विविध स्तरांवर, समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या व्यक्तींना सेवामहर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील १० पुरस्कार आज वितरित केले जातील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---