जळगाव जिल्हा

जळगावात कष्टकरी कामगारांसाठी भव्य आरोग्य शिबिर; ५०० कामगारांची तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कष्टकरी कामगारांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य आणि भाजपा जळगाव जिल्हा महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे ५०० कामगारांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कामगारांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वठार, बाजार समितीचे संचालक अशोक राठी, दीपक परदेशी, डॉ. अरुण पाटील, मिलिंद चौधरी, योगराज सपकाळे, इंद्रराज सपकाळे, समाधान धनगर, संतोष इंगळे, विजय वानखेडे, कॉमेश सपकाळे, राजू मराठे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

New Project 8 1

विविध आजारांची तपासणी; औषधोपचारही मोफत

शिबिरात हृदयरोग, स्त्रीरोग, जनरल मेडिसिन, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, नाक-कान-घसा आणि युरोलॉजी यांसह विविध विभागांतील तज्ज्ञांकडून कामगारांची तपासणी करण्यात आली. रक्ताच्या विविध तपासण्याही करण्यात आल्या. आवश्यकतेनुसार कामगारांना मोफत औषधे देण्यात आली. दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या कष्टकरी कामगारांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, शासकीय दंत महाविद्यालय, जळगाव आणि महादेव हॉस्पिटल, जळगाव यांचे सहकार्य लाभले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे परिश्रम

शिबिराचे संयोजन पितांबर भावसार यांनी केले. त्यांनी सूत्रसंचालन केले, तर व्यापारी आघाडीचे अशोक राठी यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विनय बाहेती, संतोष पवार, विष्णुकांत मणियार, मनोज नागला, सुनील तापडिया, दीपक महाजन, मुकेश कुकरेजा, व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, हमाल-मापाडी संघटनेचे पदाधिकारी आणि जी.एम. फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button