---Advertisement---
धरणगाव गुन्हे

जळगावातील आणखी एक ग्रामसेवक जाळ्यात; २५०० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ जानेवारी २०२३ | अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाला लाच घेतांना अटक केल्याची घटना ताजी असताना आणखी एका ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना अटक केली आहे. सवर माहिती देण्याच्या मोबदल्यात धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला २५०० हजाराची लाच स्वीकारताना आज गुरुवारी अँटी करप्शन ब्यूरो, जळगाव यांनी अटक केली. अनिल नारायण गायकवाड (रा. चहार्डी, ता. चोपडा) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

lach jpg webp

नेमका काय आहे प्रकार?
तक्रारदार हे गारखेडा येथील रहीवासी आहे. त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक यांचेकडे सदर ग्रामपंचायती मध्ये सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितलेली होती.
सदरची माहिती ही वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सवर माहिती देण्याच्या मोबदल्यात गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रथम ३,०००/रुपये व तडजोडीअंती २,५००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---