जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे शुक्रवार, दिनांक ९ मे २०२५ रोजी पदवीदान समारंभ पार पडला.
बीएस्सी पी.बी.बीएस्सी पदवी आणि एम एस्सी पदविका धारकांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर यशाचे समाधान आणि पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास दिसून येत होता.

या सोहळ्याला डॉ. प्रशांत सोलंकी (डीन), डॉ. एन.एस. आर्विकर (डायरेक्टर, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल), डॉ. प्रेमचंद पंडित (वैद्यकीय अधीक्षक), प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. जस्निथ दया, प्रा. अश्विनी वैद्य , प्रा. मनोरमा इसाक, प्रा. मिनोव देवी, प्रा. अश्विनी मानकर, प्रा पियुष वाघ आणि प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हेसह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, त्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्या आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने हे क्षण साजरे करत आपल्या शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले.प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, आजचा दिवस हा शेवट नसून आरोग्यसेवेत तुम्ही सुरू करत असलेल्या यशस्वी प्रवासाचा पहिला पायरी आहे. ही सेवा हीच खरी साधना आहे.या प्रसंगी माननीय डॉ. उल्हास पाटील सर यांनी आपल्या संदेशामध्ये विद्यार्थ्यांना जीवनात सेवाभाव, सहानुभूती आणि व्यावसायिक नैतिकता यांचे महत्त्व पटवून दिले.
त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.समारंभाच्या यशस्वी आयोजनात प्रा. मनोरमा इसाक प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. प्रियांका गवई, प्रा. श्वेता लांडगे आणि प्रा. गिरीश खडसे यांचे विशेष योगदान लाभले.कार्यक्रमाचा समारोप सामूहिक छायाचित्र, विद्यार्थी-पालक संवाद आणि आनंदी वातावरणात झाला. १५७ विदयार्थ्यांनी पदवी व पदविका ग्रहण केली. समारोप राष्ट्रगिताने झाला.