जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देत राज्यपालांचे स्वागत केले.
राज्यपाल आज रात्री शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स येथे मुक्काम करणार असून उद्या सकाळी जैन हिल्स परिसराला भेट देऊ ते पुढील कार्यक्रमांना उपस्थिती देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे रवाना होणार आहेत.