बाजार समित्यांमध्ये होणार सोयाबीन, उडीद, मुगाची शासकीय खरेदी ; असे आहेत दर

नोव्हेंबर 17, 2025 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, उडीद आणि मूग पिकांच्या शासकीय खरेदीला लवकरच सुरुवात होणार असून, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीलाही सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी करण्याची राज्य पणन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

soyaben udid mung

खासगी बाजारात सोयाबीन, उडीद आणि मूग यांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मात्र, आता बाजार समित्यांमध्येही शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे. यामुळे, बाजार समितीकडूनही लवकरच या पिकांची हमीभावाने खरेदी सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी बाजार समितीतही नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शासकीय हमीभाव खरेदी सुरू होणार असल्याने, खासगी बाजारातील दराच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव दर मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisements

असे आहेत दर

केंद्र शासनाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता मूग ८ हजार ७६८ रुपये प्रतिक्विंटल, उडीद ७हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल, तर सोयाबीनचा ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now