⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

वडोदा येथे “महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी” आयोजित शिबीर

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वडोदा येथे “महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दर्शवुन जनतेच्या समस्या जाणुन घेत मार्गदर्शन केले.

वडोदा येथे ‘शासन आपल्या दारी’ या आजोजित शिबिरात पुरवठा विभागा मार्फत रेशन कार्ड बद्दल’च्या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. तहसीलदार श्वताताई संचेती, शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, सरपंच सपना खिरोळकर, उपसरपंच रंजना कोथलकर, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक, कोतवाल, शहरप्रमुख पंकज पांडव, पुंडलिक सरग, गण प्रमुख नारायण पाटील, सतीश नागरे, गट प्रमुख जावेद भाई, युवा सेना शहर प्रमुख अविनाश वाढे, श्रावण धाडे, राहुल खिरडकर उपस्थित होते.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन केले. पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून देण्याकरीता शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय अन्न योजना, नाव कमी करणे वा वाढविणे, जीर्ण झालेल्या शिधापत्रिका तात्काळ बदलवुन देणे, तसेच जातीचा दाखला अशा प्रकारची कामे गावपातळीवर करण्यात आले.या शिबिरास गावकऱ्यांकडुन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.