जळगाव लाईव्ह न्यूज । सध्याच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत असून वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गोरखपूर ते बेंगळुरू दरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष ही रेल्वे भुसावळमार्गे धावणार असल्याने जळगावसह भुसावळच्या प्रवाशांची सोय होणार आहे.

रेल्वे क्रमांक ०६५२९/०६५३० सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल, बंगळुरू-गोरखपूर- सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल, बंगळुरू समर स्पेशल तीन फेऱ्यांमध्ये चालवली जाईल. ०६५२९ ही उन्हाळी विशेष गाडी १२, १९ आणि २६ मे रोजी रोजी बंगळुरू येथील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल येथून तर ०६५३० क्रमांकाची गाडी १६, २३ आणि ३० मे रोजी गोरखपूर येथून धावेल.
ही ट्रेन भुसावळला डाऊन मार्गावर पहाटे ३.३५ वाजता पोहोचेल आणि ३.४० ला निघेल तर अप मार्गावर रात्री ११.१० वाजता पोहोचेल आणि ११.१५ वाजता सुटणार आहे.
या स्थानकांवर थांबेल?
ही ट्रेन देवरिया सदर, भटनी, मऊ, वाराणसी, प्रयागराज, झांसी, बिना, राणी कमलापती, खांडवा, भुसावळ, मनमाड, दौंड, पुणे, मिरज, बेळगाव, हुब्बल्ली, दावणगेरे, अर्सिकेरे आणि तुमकूर या महत्वाच्या स्थानकांवर थांबेल.
या ट्रेनमध्ये एकूण २० कोच असतील, ज्यामध्ये १ फर्स्ट क्लास एसी, २ सेकंड क्लास एसी, ४ थर्ड क्लास एसी, ७ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ एसएलआर/डी कोच असतील. या कोचमध्ये सर्व प्रकारचे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार तिकिटे बुक करू शकतात.