⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावातील जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद

जळगावातील जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व संसर्गाची साकळी तोडण्यासाठी १२ ते १४ मार्चदरम्यान जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी जळगावकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

कोरोनाचे रूग्ण जळगाव शहरात प्रचंड प्रमाणावर वाढत असल्यामुळे विविध संघटनांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी काल ११ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री देखील शहरात शांतता होती. जनता कर्फ्यूच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणीही बाहेर पडून नये असे आहवान, आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.  कोणत्याही भागात गर्दी होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनावर जबाबदारी सोपवली आहे.

जनता कर्फ्यू असल्‍याने मार्केट, वेगवेगळी दुकाने, भाजीबाजार सर्व काही बंद असल्‍याने यासाठी होणारी गर्दी आज पाहण्यास मिळत नाही.  जनता कर्फ्यू हा जनतेने स्वयंस्फूर्तीने पार पाडायचा असला तरी, या कर्फ्यूमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीपासून सुरवात झाली असून, पहिल्या दिवसापासून नागरिकांसह व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्‍याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील सुभाष चौक, सराफ बाजार, दाणाबाजार, बळीराम पेठ, टॉवर चौक, गोलाणी मार्केट व फुले मार्केट परिसर, बस स्थानक या नेहमी वरदळ असलेल्‍या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.