जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । भुसावळ प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव दरम्यान २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची हाेणारी गर्दी विभागली जाणार आहे, त्यांच्या जागेचा प्रश्नही मिटणार आहे. यात ०११३९ विशेष गाडी २७ जुलै २०२२ ते २८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.५ वाजता सुटेल.
मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५. ३० वाजता ही गाडी पोहोचेल. ०११४० ही विशेष गाडी २८ जुलै २०२२ ते २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी मडगाव येथून सायंकाळी सातला सुटणार आहे. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी येथे थांबा आहे. यात एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे या गाडीला असतील.