⁠ 
रविवार, मे 19, 2024

आनंदाची बातमी : मान्सुन महाराष्ट्रात दाखल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ ।  गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. कारण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. या मुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

राज्यात यंदा जवळपास दीड महिन्यांपासून ४० अंशापेक्षा जास्त तापमान होते. काही दिवस तर पारा ४५ अंशाच्या पार गेला होता. या मुळे नागरिक त्रस्त झाले होते. आज राज्यात नैऋत्य मौसमी वार्‍यांनी अर्थात मान्सूनने एंट्री केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून आला होता, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यानी ट्विट करत मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनचे ११ जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा,कर्नाटक, तामीळनाडू अन् आंध्रप्रदेशचा् काही भाग मान्सूनने व्यापला आहे. तर, आता शेतकरी बांधवानी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे, परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये