जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । संपुर्ण देश ज्याची यातका सारखी वाट पाहत होता ती आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
आज केरळात मान्सूनचं आगमन झालं आहे. चक्रीवादळामुळं १६ जूननंतर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. पण हवामानात मोठे बदल झाला आहे. एका आठवड्याच्या विलंबानंतर काहोईना पण मान्सून आला.
आज केरळमध्ये मान्सूननं हजेर लावली असून राज्यात लवकरच दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.