⁠ 
सोमवार, मे 20, 2024

आनंदाची बातमी : जळगावच्या सिव्हीलचा वाजला राज्यात डंका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ ।  राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे प्रथमच राज्यातील महाविद्यालय व रुग्णालयाची महिनाभरातील कामगिरी पाहून रँकिंग देण्यात आले आहे. यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला गोल्ड या वर्गवारीत स्थान मिळाले. तसेच राज्यातून पाचवा क्रमांक मिळाला असून हे महाविद्यालयाचे सांघिक यश असल्याची प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतिहासात यंदा प्रथमच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची आणि संलग्न रुग्णालयांची महिनाभरातील कामगिरी बघून रेटिंग देण्यात आले. यामध्ये जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पाचवा क्रमांक पटकावला असून गोल्ड मेडल मिळवले आहे.

या महाविद्यालयांचे रेटिंग करताना गोल्ड सिल्वर ब्रांच अशा पदकांची वर्गवारी करण्यात आली. यामध्ये 19 महाविद्यालयांच्या गुणांनुसार क्रमांक देण्यात आले आहेत. जळगावच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाने पाचवा क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळवले.

मुंबई येथील प्रसिद्ध जे जे रुग्णालय दुसरा क्रमांक पटकावण्यात यशस्वी ठरले. प्रथम क्रमांक हा आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पटकावला आहे. तर जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल ने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

जीएमसीतून माहिती देण्यासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विलास मालकर, डॉ. डॅनियल साझी यांनी समन्वयन केले. दरम्यान, रुग्णालयात चांगल्या सुविधा व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत असून ग्रामीण भागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.