जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । धरगावच्या होमगार्ड यांना गेल्या अनेक वर्षांपासून अपघात विमा, मेडीकल विमा यांच्यासह मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज योजना सुविधा मिळण्याची मागणी महाराष्ट्र होमगार्ड संघटनेतर्फे करण्यात आले होते. अखेर सुविधा उपलब्ध होण्यासाकरीता एचडीएफसी बँकेत खाते वर्ग करण्यात येत असून एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक सुविधा मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
होमागार्डस यांना अपघात विमा, मेडीकल विमा यांच्यासह मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज योजना सुविधा मिळण्याची मागणी महाराष्ट्र होमगार्ड संघटनेतर्फे करण्यात आले होते. अखेर ती सुविधा मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे. होमागार्ड संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गवळी, प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव आणि केंद्र प्रमुख संदीप तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २ हजार २५० होमगार्ड यांचे एचडीएफसी बँकेत खाते वर्ग करण्यात येत आहे.
याप्रसंगी धरणगाव तालुका समादेशक ईश्वर महाजन, क्लर्क जानकीराम पाटील, अशोक देशमुख, स्वप्निल जैन, अरूण सातपुते, प्रताप वराडे, भिकन लोहार यांच्यासह होमगार्डस उपस्थित होते.