⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

सुखद बातमी : नऊ तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने मूर्तिजापूर-माना रेल्वे स्थानकादरम्यानच्या हिरापूर गेटजवळ रेल्वे रूळाखाली वाळु वाहून गेली होती. ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. यामुळे अप्रिय घटना टळली. मात्र याचा परीणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता. मात्र वाहतूक पूर्ववत करण्यात यंत्रणेला यश आले असुन पहिली गाडी या मार्गावरून रवाना झाली आहे

प्राप्त माहितीनुसार मानापासून सहा किलोमीटर अंतरावरील हिरापूर गेट येथील खंबा नंबर 35/46 नंबरच्या अपडाऊन रुळावरील गिट्टी हे पाण्याने वाहून गेल्याची घटना हिरापूरगेट जवळ घडली. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या प्रभावीत झाल्या होत्या. ही घटना सोमवारी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. होती. रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ युध्द पातळीवर 9 तास काम करण्यात आल्यानंतर मंगळवारी पहाटे 3.40 वाजता पहिली गाडी या मार्गावरून भुसावळकडे धावली. शेतातील शेततळे ओव्हरफ्लो झाल्याने ते फुटले आणि पाण्याचा जोरदार प्रवाह रेल्वे रुळाच्या दिशेने वाहू लागल्याने रेल्वेच्या रुळाखालील गिट्टीचा भराव वाहून गेला. त्यामुळे रेल्वे रूळ चार ते पाच फूट अधांतरी राहिल्याची बाब सतर्क ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. रेल्वे रूळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वे प्रशासनाकडून युध्द पातळीवर काम केले. काम पूर्ण झाल्यावर पहाटे 3.40 वाजता येथून पहिली गाडी हावडा मेल काढण्यात आली. नऊ तासानंतर हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

पाच रेल्वेगाड्या वळवल्या
पुरी-सुरत (22827) ही एक्सप्रेस बडनेरा, चांदूर बाजार-नरखेड इटारसी खंडवा-भुसावळ-जळगावमार्गे वळविण्यात आली. सुरत-मालदा एक्सप्रेस (13426) भुसावळ-खंडवा-इंटारसी-नागपूरमार्गे, हिसार-सिकंदराबाद एक्सप्रेस (22738) ही गाडी अकोला-पूर्णा-नांदेड मार्गे वळवण्यात आली तर पूर्णा- हावडा (12221) ही गाडी भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूरमार्गे तर नागपूर- छत्रपती शिवाजी टर्मिनस (12940) ही गाडी मंगळवारी नागपूरऐवजी भुसावळ येथून सुटली. 12136 ही गाडी नागपूर-पुणे सुपरफास्ट गाडी सुधदा इटारसी, खंडवा, भुसावळमार्गे मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्थानकावर आली.