⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | कृषी | खुशखबर! पीक विम्यासाठी ३ दिवसांची मुदतवाढ

खुशखबर! पीक विम्यासाठी ३ दिवसांची मुदतवाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान होते. तेच टाळण्यासाठी तसेच नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती ती आता 3 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात काही भागात अतिशय कमी पाऊस झाला असून, पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार नसल्याने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ मिळावी अशी मागणी शेतकरी करत होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.