जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील दयानंद पुलावरून एक विवाहिता जात असतांना विवाहितेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत दोन चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे.
चाळीसगाव शहरातील मोरया नगरातील विश्वास धर्मराज चौधरी हे मेहुणबारे येथील आश्रम शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी कल्याणी विश्वास चौधरी या रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दयानंद हॉटेल समोरील पुलावरून जात असताना अचानक दोन तरुण दुचाकीवरून जवळ आले. त्यातील मागे बसलेला व राखाडी रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने कल्याणी चौधरी यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबवली. सदर विवाहितेने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात कल्याणी विश्वास चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.