⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅमचा तपासून घ्या

सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅमचा तपासून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । मध्यंतरी घसरल्यानंतर सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. सततच्या वाढीने या आठवड्यात सोन्याचा दर 52 हजारांच्या पुढे गेला. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 57 हजाराच्या पुढे गेला आहे. Gold Silver Rate Today

सराफा बाजारात (Sarafa Bazar) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 52,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा दर 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजे गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात सोन्याच्या दरात 517 रुपयांचा फरक पडला. सोन्यावरील जीएसटी शुल्क वेगळे भरावे लागते. सोन्याचा दागिना खरेदी केल्यावर ग्राहकाला शुल्क ही द्यावे लागते, त्यामुळे किंमती जास्त मोजावी लागते.

या आठवड्यात सोन्याचे दर
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती, मात्र आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत हे दर झपाट्याने वाढले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, सोमवारी (1 ऑगस्ट) सोनं 51,405 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आणि त्यानंतर वाढ कायम राहिली.

बुधवारी सोन्याचा दर 51,486 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी तो 51,815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याच्या किंमत 52 हजारांच्या पुढे गेली आणि 51,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली.

24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, 5 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सर्वाधिक 52,140 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,931 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. सर्व प्रकारच्या सोन्याचा दर कर न लावता मोजण्यात आला आहे. सोन्यावरील जीएसटी शुल्क वेगळे भरावे लागते. सोन्याचा दागिना खरेदी केल्यावर ग्राहकाला शुल्क ही द्यावे लागते, त्यामुळे किंमती जास्त मोजावी लागते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.