सोन्याचा भाव पुन्हा लाखांच्या पार ; तपासून घ्या आताचे भाव?

जुलै 21, 2025 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी १ लाख रुपयाच्या खाली आलेला सोन्याचा भाव पुन्हा लाखांच्या पार गेले. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.

gold jpg webp

सोमवारी २१ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याने प्रति तोळे १ लाखांचा टप्पा पुन्हा एकदा ओलांडला. सोन्याच्या दरात झालेली ही वाढ अनपेक्षित नसली तरी, तिच्या वेगाने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १० तोळ्यांच्या दरात ११०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर १,००,१५० रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.

२२ अँड २४ कॅरेट सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचे दर १,००,१५० रुपये आहेत. या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,१२० रुपये झाले आहेत. तर आज १ तोळा सोन्याचे दर ९१,८०० रुपये आहेत. या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,४४० रुपये आहेत.

चांदीचे दर

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ९२८ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीचे दर १,१६० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,६०० रुपये आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now