Gold Rate : रक्षाबंधननंतर सोने दरात मोठा बदल, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आताचे दर..

ऑगस्ट 11, 2025 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । मागच्या आठवड्यात सोने दराने नवीन उच्चांक गाठला. यामुळे ऐन रक्षाबंधनला सोन्याने उच्चांकी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली. दर गगनाला भिडल्याने दरवर्षीपेक्षा या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सोने खरेदी कमी प्रमाणात झाली. परंतु रक्षाबंधननंतर सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे.

gold silver jpg webp

आज आठवड्याच्या पहिल्याच्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात जरी घसरण झाली तरीही सोन्याचे दर एक लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आजही सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडलेला आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर

आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ७६० रुपयांची घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,०२,२८० रुपये प्रति तोळा झाले आहेत. ८ ग्रॅमचे दर ८१,८३४ रुपये झाले आहेत. यामध्ये ६०८ रुपयांची घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली. १० ग्रॅमची किंमत ९३,७४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७५,००० रुपये झाले आहेत. या दरात ५६० रुपयांची घसरण झाली आहे. आणि १० तोळा सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे.हे दर ९,३७,५०० रुपये झाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now