Gold Silver Rate : सोनं आणखी महागले ; वाचा आजचे भाव

एप्रिल 7, 2022 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) दरामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. कालच्या घसरणीनंतर आज सोने-चांदी पुन्हा महागली आहे. आज गुरुवारी जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २३० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ११० रुपयाची वाढ झाल्याचे दिसून येतेय. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने १६० रुपयाने स्वस्त झालं होते तर चांदीत १०० रुपयाची घट झाली होती.

gold silver price jalgaon

जळगावचा आजचा सोने-चांदीचा दर? Gold Silver Rate
आज बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,८१० रुपये इतका आहे. तर चांदी ६७,८६० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढला असून यामुळे आशियात घबराट पसरली आहे. शांघाईमध्ये यापूर्वीच लाॅकडाउन लागू करण्यात आला आहे. तिथं मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहे. करोनाची चौथी लाट सुरु झाली असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक ओघ वाढला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊननंतर गेल्या महिन्यात रशिया आणि युक्रेन युद्ध पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. युद्धादरम्यान, सोन्याचा भाव ५५६०० रुपयांवर गेला होता. तर कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये सोने दर ५६,२०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या तीन दिवसात चांदीच्या दरात १३२० रुपयाची घसरण दिसून आली. तर गेल्या चार दिवसात सोने दोन वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झाले आहे.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,५५० रुपये होते. तर ५ एप्रिल रोजी ५२,७४०, ६ एप्रिल रोजी ५२,५८०, तर आज ५२,८१० रुपयावर आहे. तर दुसरीकडे ४ एप्रिल रोजी चांदी दर ६८,३०० प्रति किलो होती. ५ एप्रिल ६७,८५०, ६ एप्रिल ६७,७५० तर आज ६७,८६०.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now