⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ग्राहकांना दिलासा! उच्चांकापासून सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पहा ताजे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२३ । सोने चांदीच्या किमतीने सणासुदीपासून मोठी उसळी घेतली. सध्या लग्नसराईच्या या काळात सोन्या-चांदीचे (भाव कधी वाढतात तर कधी खाली येतात दिसत आहे. या आठवड्यात पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. सोबतच चांदी दरात विक्रमी वाढ झाली होती. मात्र उच्चांकी पातळीवरून दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसत आहे.

जळगाव सुवर्णनगरीत शुक्रवारी सोन्याच्या किमतीत १५० रुपयापर्यंतची वाढ झाली. तर दुसरीकडे चांदीच्या वाढत्या किमतीला ब्रेक लागला. शुक्रवारी चांदीच्या किमतीत तब्बल १७५१ रुपयाची घसरण झाली. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह ६४,८५० रुपायांवर विकला जात आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर ७६,७५० रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

दरम्यान, यापूर्वी सोमवारी(४ डिसेंबर) सोन्यासह चांदीच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जीएसटीसह ६६,२२९ रुपयावर पोहोचला होता. तर चांदीचा एक किलोचा दर जीएसटीसह ८०,३४० गेला होता. मात्र त्यांनतर दोन्ही धातूंमध्ये बदल झालेला दिसून आला.

चांदीच्या किमतीत मंगळवारी (५ डिसेंबर) तब्बल २०३० रुपयांची मोठी घसरण झाली. त्यानंतर बुधवारी १०३० रुपयांची वाढ होत गुरुवारी चांदी प्रती किलो ७८, ४८६ रुपयांवर पोहचली असताना शुक्रवारी या आठवड्यात दुसऱ्यांदा १७५१ रुपयांची मोठी घसरण झाली. त्यामुळे चांदीचे दर ७६७३५ रुपयांपर्यंत खाली आले. गुरुवारी सोन्याच्या दरात प्रती तोळ्यामागे ५० रुपयांची वाढ होऊन ते ६४,६८२ झाले होते. शुक्रवारी त्यात १५१ रुपयांची वाढ होत सोन्याचे दर ६४८३८ रुपयांवर पोहाचेले आहे.