⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सोने-चांदीने मोडले खरेदीदारांचे कंबरडे ; काय आहे आजचा प्रतितोळा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२३ । आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने मागच्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ नोंदवली गेली आहे. सध्या लग्न सराईची धामधूम सुरू त्यातच भावात वाढ झाल्याने सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate Today

संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय. सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 61,300 (विनाजीएसटी)रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर 63,500 रुपयापर्यंत विकला जात आहे. परंतु

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. 

दुसरीकडे चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास दोन दिवसापूर्वी सराफ बाजारात चांदीचा एक किलोचा दर 77,800 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलोवर विकला जात होता. मात्र त्यात गेल्या दोन दिवसात घसरण झालेली दिसून येतेय. सध्या चांदीचा एक किलोचा दर 76,800 रुपये (विनाजीएसटी) विकला जात आहे.

ऐन लग्न साराईच्या तोंडावर ही दर वाढ झाल्याने सर्व सामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर सोने गेल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीचे प्रमाण कमी केल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात होत असलेली वाढ पाहता आणि अजूनही सोन्याचे वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात सोन्याचा भाव 65000 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच चांदी देखील लवकरच 85000 हजार रुपयाचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली आहे.