---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

Gold-Silver Today: सोन्याचा दर कुठपर्यंत जाणार? आजचे भाव जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२३ । गुढीपाडव्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीनेही मोठी उसळी घेतली आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारात दिसून येत आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. अशातच काही दिवसांच्या अंतरावर अक्षय तृतीया असताना पुन्हा सोन्या (Gold Rate)-चांदीचे भाव कमी झाले आहे. सध्या वीकेंडची संधी साधत अनेक नागरिकांचा कल हा सोनं खरेदीकडे दिसून येत आहे. Gold Silver Rate Today

gold silver 1

आजचा सोन्याचा भाव काय?
जळगाव सुवर्ण नगरीत आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,600 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तर तर 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 60,700 रुपये (विना जीएसटी) आहे. यापूर्वी काल शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 60,600 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात किरकोळ 100 रुपयाची वाढ दिसून येतेय.

---Advertisement---

दरम्यान, जळगावात गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा दर 58,500 रुपयापर्यंत होता. त्यांनतर सोन्याच्या किमतीत वाढ होत असताना दिसून आली. या आठवड्याच्या बुधवारी सोन्याच्या किमतीने तर सगळे रेकॉर्ड तोडले होते. यादिवशी सोन्याचा दर 61 हजार रुपयांवर गेला होता. मात्र त्यादिवसापासून आतापर्यंत सोन्यात काहीशी घट दिसून येत आहे. मात्र, आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 65,000 पर्यंत जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

आजचा चांदीचा दर काय?
आज चांदीचा एक किलोचा अंदाजित भाव 74,500 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीचा दर 69,000 रुपयापर्यंत होता. मात्र त्यात आतापर्यंत मोठी वाढ झालेली दिसून आली.

दरवाढीचे कारण?
अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आली आहे. या दमकोंडीमुळे डॉलर घसरला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती भडकल्या आहेत. 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---