⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | Gold-Silver Rate : सोने-चांदी दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

Gold-Silver Rate : सोने-चांदी दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात वाढ दिसून आलीय. जळगाव सराफ बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने ३०० रुपयाने महागले आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५३ हजारांवर गेला आहे. तर चांदी ४७० रुपयाने महागली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने २३० रुपयाने तर चांदी ११० रुपयाने महागले होते.

जळगावचा आजचा सोने-चांदीचा दर? Gold Silver Rate
आज बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,११० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,३३० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे आशियात घबराट पसरली आहे. शांघाईमध्ये यापूर्वीच लाॅकडाउन लागू करण्यात आला आहे. तिथं मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहे. करोनाची चौथी लाट सुरु झाली असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक ओघ वाढला आहे.

या चालू आठवड्यात सोने ३ वेळा महागले आहे तर दोन वेळा स्वस्त आले आहे. या आठवड्यात सोने जवळपास ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात घट दिसून आलीय. चांदीच्या दरात ८०० रुपयापर्यंत ची घट दिसून आलीय. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊननंतर गेल्या महिन्यात रशिया आणि युक्रेन युद्ध पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. युद्धादरम्यान, सोन्याचा भाव ५५६०० रुपयांवर गेला होता. तर कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये सोने दर ५६,२०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,५५० रुपये होते. तर ५ एप्रिल रोजी ५२,७४०, ६ एप्रिल रोजी ५२,५८०, तर ७ एप्रिल ५२,८१० रुपयावर होता. तर दुसरीकडे ४ एप्रिल रोजी चांदी दर ६८,३०० प्रति किलो होती. ५ एप्रिल ६७,८५०, ६ एप्रिल ६७,७५० तर ७ एप्रिल ला ६७,८६० प्रति किलो इतका होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.