जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२३ । मागील गेल्या काही दिवसापासून भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून आली. यामुळे सोन्याचा दर सात महिन्याच्या नीच्चांकीवर आला आहे. चांदीच्या कितमीत देखील मोठी घसरण झाली. पितृपक्षात मौल्यवान धातुंच्या मागणीत घट होणे हे दर कमी होण्यामागील कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मात्र, काल शुक्रवारी व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. या काळात 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 64 रुपयांनी महागले आणि 52,204 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 130 रुपयांनी वाढून 56,950 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
MCX वरील दर :
तर चांदीचा भाव 1230 रुपयांनी वाढून 68,350 रुपये प्रति किलो झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली. येथे सोने 56,898 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो 68,290 रुपयांवर पोहोचला.
जळगावमधील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 52,750 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकला जात आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 68,500 रुपये प्रति किलोने विकला जात आहे.
दरम्यान, सोने दरात सध्या जरी घसरण दिसत असली तरी नवरात्रोत्सवात दरात पुन्हा तेजी येवून सोने 65 हजारांवर जातील असे सराफांचे म्हणणे आहे.