⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

ग्राहकांसाठी गूड न्यूज! आज सोने-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२३ । गेल्या महिन्याच्या सोन्या पाठोपाठ चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंच्या किमतीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला. यातच आता दिवाळी (Diwali) सण तोंडावर आला असताना लोकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. अशात मात्र दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आज सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाली आहे.

गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज 7 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 110 रुपयांनी घसरून 61,360 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी घसरून 56,250 रुपयांवर आला आहे.

गेल्या दहा दिवसांत सोन्यात घसरण दिसून आली. या दहा दिवसांमध्ये सोने जवळपास 1400 रुपयांनी उतरले तर या काळात त्यामध्ये 220 रुपयांची वाढ झाली. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. 3 नोव्हेंबर रोजी त्यात 100 रुपयांची वाढ झाली. 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले.

दुसरीकडे चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,200 रुपये आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज मंगळवारी सोन्यासह चांदी दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव 246 रुपयांनी घसरून 60524रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याशिवाय चांदीच्या दरात 629 रुपयांनी घसरला आहे. आज एमसीएक्सवर चांदीची किंमत 71,488 रुपये प्रति किलो आहे.