⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

ग्राहकांसाठी खुशखबर ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२३ । लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असताना सोने व चांदीच्या किमतीने मोठी भरारी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र अशातच सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून गेल्या दोन दिवसांत किंमतीत मोठी घसरण झाली. Gold Silver Rate 7 December 2023

दोन्ही धातूंचे दर सलग दुसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात १६८० रुपयांची घसरण नोंदवली गेली. तर चांदी दर दोन हजार रुपयांनी घसरून पुन्हा हजार रुपयांनी वाढले. त्यामुळे अभ्यास करूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

सोन्याच्या दरात ४ डिसेंबर रोजी वाढ होऊन ६६२२९ रु. तोळ्याचा उच्चांक गाठला तर चांदीने आधीच्या उच्चांकाची (८०,३४० रु किलो) बरोबरी साधली होती. अमेरिकन फेडरलने जाहीर केलेल्या बेरोजगारीच्या अहवालानंतर शनिवारी सोने चांदीच्या दरात तेजी आली आहे. ती रविवार व सोमवारीही कायम होता. मात्र मंगळवारी आणि बुधवारी सोने दरात घसरण झाली. मंगळवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर १३४० रुपयांनी घसरून ६४,९०० रुपयांवर आला तर बुधवारी आणखी ३४० रुपयांनी घसरून ६४,३७५ रुपयांवर आले. पुढील आठवड्यात दर पुन्हा वाढतील. चालू वर्षाच्या डिसेंबरअखेरपर्यंत सोन्याचे दर ६४ हजारपेक्षा अधिक होऊ शकतात, असा अंदाज आहे.

दुसरीकडे मंगळवारी चांदीच्या किमतीत २०६० रुपयांनी घसरण झाली. मात्र बुधवारी यात वाढ झाली. बुधवारी चांदीचा दर १०३० रुपयांनी वाढून ७९,३१० रुपये प्रति किलोवर पोहोचले. जागतिक पातळीवरील घडामोडीचा परिणाम सोन्याचा दरावर होत असल्याचं मानलं जात आहे.