⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

Gold Silver Rate Today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागली

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात वाढ झाली आहे. आज जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात सोने २९० रुपयाने वाढले आहे. त्यामुळे आज शुक्रवारी २४ १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,०९० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात २३० रुपयाने महागले असून आज चांदीचा प्रति किलोचा दर ६३,८०० रुपयांवर आला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने २०० रुपयाने तर चांदी ३८० रुपयांनी स्वस्त झाली होती.

गेल्या महिन्यात उच्चांक स्थरावर गेलेले सोने आणि चांदीचे दर आता पुन्हा निच्चांकी पातळीवर येऊ लागला आहे. गेल्या दोन आठवड्याच्या घसरणीनंतर या चालू आठवड्यात देखील सोने दरात मोठी घसरण झाली आहे. या आठवड्यात सोने तीन वेळा महागले आहे. तर दोन स्वस्त झाले आहे. या पाच दिवसात सोने जवळपास ७५० ते ८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १३५० ते १४०० रुपयांची घसरण झाली आहे.
तर दुसरीकडे

तर दुसरीकडे चांदी दोन वेळा महागली आहे तर तीन वेळा स्वस्त झाले आहे. पाच दिवसात चांदीचा २६०० ते २७०० रुपयांहून स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदी ३२५० ते ३३०० रुपयाने स्वस्त झाली आहे. दरम्यान, यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. पारंपारिक धारणेनुसार अक्षय्यतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाताे. या दिवशी सोन्याच्या दरात तब्बल ११०० शेहून अधिक घसरण झाली होती. तर चांदी देखील १२०० रुपायांनी स्वस्त झाली होती.

या आठवड्यातील दर
सोने : जळगावमध्ये २ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,९७० रुपये होते. ३ मे रोजी ५१,८५०, ४ मे रोजी ५२,००० तर ५ मे रोजी ५१,८०० प्रति तोळा इतका आहे.

चांदी : तर दुसरीकडे २ मे रोजी चांदी दर ६५,०५०, ३ मे ६३,७४०, ४ मे ६३,९५० तर ५ मे रोजी ६३,११० प्रति किलो इतका होता.