⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री ; सोने-चांदीचे दर पुन्हा भडकले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून यामुळे पुन्हा एकदा खरेदीदारांच्या खिशाला कात्री बसताना दिसत आहे. आज पुन्हा सोन्यासह चांदीच्या दरात किचिंत वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवली गेली तर काही दिवसांत घसरण दिसून आली. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या किंमत वाढली आहे. दोन्ही धातूंचे दर पुन्हा विक्रमी दिशेने वाटचाल करत आहे.

सोन्याचा भाव पुन्हा महागला
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा ऑगस्ट वायदा ३९० रुपयांनी वाढून ७२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून सकाळपासून सोन्याच्या वायदे किंमतीत वाढीसह व्यवहार होत आहेत. गेल्या महिन्यात सोन्याची वायदे किंमत ७४,४४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली होती. दुसरीकडे, सोन्यापाठोपाठ चांदीच्या वायदे दरातही विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. MCX वर आज सकाळी चांदी १,४०९ रुपये वाढीसह ९१,८५३ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णपेठेतील दर
जळगावात सध्या २२ कॅरेट सोने प्रति तोळा विनाजीएसटी ६१,२०० रुपयांवर तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,४०० रुपयावर आहे.तर एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९१५०० रुपयांवर आहे.