⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

चांदीच्या किमतीत मोठी वाढ, मात्र सोने स्थिर ; नवीन दर तपासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२३ । राज्यात राजकीय घमासान सुरु असताना सोने-चांदीत (Gold Silver) पण चढउतार सुरु आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतींनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. दोन महिन्यात दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठलेला नाही. मात्र मे पासून सोने-चांदीची घसरगुंडी सुरु असून आता सोने 58,000 रुपयांच्या पण खाली उतरते की काय, असे चित्र आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत मोठा धमाका झालेला नसल्यामुळे ग्राहकांना गुंतवणुकीची मोठी संधी आहे. Gold Silver Rate Today

आज जळगाव सुवर्णनगरीतील दर काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 53,820 रुपयांवर आहे. तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 58,750 रुपये आहे. दरम्यान, सोन्याचा दर स्थिर असल्याचे दिसून येतंय मात्र दुसरीकडे चांदीचा दर वधारला आहे.

सध्या चांदीचा दर विनाजीएसटी 71,500 रुपयापर्यंत आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर 70,600 रुपयावर होता. म्हणजेच एक दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 1100 ते 1200 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील आजचा दर?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 58,474 रुपये प्रति 10 ग्रॅम दरावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा 71,300 प्रति किलोवर व्यवहार करत आहे.