⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Gold-Silver Rate : आज सोने-चांदीच्या किंमतीत झाली मोठी घसरण, घ्या तपासून आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । केंद्र सरकारने (Central Government) सोन्याच्या आयातीवरील शुल्कात वाढ केल्यानंतर गेल्या तीन सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र या दरवाढीला आज बुधवारी ब्रेक लागला असून सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या (Gold Rate) भावात ८४० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या (Silver Rate) भावात देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदी १६६० रुपयाने घसरली आहे. यापूर्वी कालच्या सत्रात सोने २१० रुपयाने तर चांदी ७६० रुपयाने महागली होती. Gold Silver Rate Today

आजचा सोने-चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,५०० रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,२०० रुपये इतका आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.

केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवल्यानंतर सोने दरात मोठी वाढ झाली होती. सलग दोन सत्रात सोन्याचा भाव जवळपास १६०० रुपयांहुन अधिकने वाढला होता. त्यामुळे सोने प्रति तोळा ५३००० रुपयांवर गेला होता. तर दुसरीकडे तीन दिवसात चांदीच्या भावात दोन वेळा घसरण झाली आहे. त्यात ११०० रुपयाची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव आणखी कमी होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
०४ जुलै २०२२ – रुपये ५३,१३० प्रति १० ग्रॅम
०५ जुलै २०२२ – रुपये ५३,३४० प्रति १० ग्रॅम
०६ जुलै २०२२ – रु ५२,५०० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
०४ जुलै २०२२- रुपये ५९,१०० प्रति किलो
०५ जुलै २०२२ – रुपये ५९,८६० प्रति किलो
०६ जुलै २०२२- रुपये ५८,२०० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते