⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदीच्या किमतीत चढउताराचे सत्र ; खरेदीला जाण्यापूर्वी आजचा दर तपासून घ्या..

सोने-चांदीच्या किमतीत चढउताराचे सत्र ; खरेदीला जाण्यापूर्वी आजचा दर तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । जगातील बाजाराचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. जुलै महिन्यात सोने-चांदीने (Gold-Silver Price) मोठी झेप घेतल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात दोन्ही धातूंचे दर काहीसे घसरले होते. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. तरीही त्यांना कोणताच रेकॉर्ड करता आलेला नाही. आता सप्टेंबर महिन्यात सोने उसळले असले तरी चांदी चमकली नाही. दोन्ही धातूंमध्ये चढउताराचे सत्र आहे. Gold Silver Rate Today

MCX वर सोने-चांदी स्वस्त
मौल्यवान धातूंचे वायदे सकाळच्या सत्रात लाल रंगात म्हणजे घसरणीसह व्यवहार करत आहेत. सोन्याचा भाव ५९ हजार रुपयांच्या वर तर चांदीचा भाव ७४ रुपयांच्या वर कायम राहिला. MCX वर सोन्याचे फ्युचर्स ५९ हजार ३६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिले तर चांदीचे वायदे ०.४४% किंवा ३२६ रुपयांनी घसरून ७४ हजार १९५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याने ६०० रुपयांची उसळी घेतली होती. सप्टेंबर महिन्यातही तेजीचे सत्र सुरु आहे. १ सप्टेंबरला भाव घसरले. तर २ सप्टेंबरला १५० रुपयांची वाढ झाली. ३ तारखेला भावात बदल झाला नाही. ४ सप्टेंबर रोजी भाव १०० रुपयांनी वधारले. २२ कॅरेट सोने ५५,४५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,४०० रुपये प्रति १० ग्रॅम असा होता.

सप्टेंबर महिन्यात चांदीला कमाल करता आली नाही. १ सप्टेंबर रोजी चांदीत ५०० रुपयांची तर २ सप्टेंबर रोजी चांदीत २०० रुपयांची घसरण झाली. ४ सप्टेंबर रोजी चांदीत किलोमागे ७०० रुपयांची घसरण झाली.ऑगस्ट महिन्यात १६ ऑगस्टनंतर चांदीने मोठी भरारी घेतली होती. चांदीत जवळपास ४००० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती.. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव ७६,००० रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.