---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

एकाच दिवसात चांदीत 1500 रुपयांची वाढ, सोनेही वधारले ; पहा नवे दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । एकीकडे लग्नसराई सुरु असून अशातच सोने आणि चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली. यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्यासह चांदीचे मोठी उसळी घेतलीय. विशेष एकाच दिवसात चांदी दरात तब्बल १५०० हजार रुपयांची वाढ दिसून आली.

gold jpg webp

जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्याच्या सोमवारी (२६ फेब्रुवारी) सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६२,५०० रुपयावर होता. तर चांदीचा एक किलोचा दर ७१,५०० रुपयांवर होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी उसळी घेतली. दुसरीकडे सोनेही महागले.

---Advertisement---

काल सोमवारी सकाळी सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६३,७५० रुपयांवर पोहोचला होता. तो आज ६४१०० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे काल सकाळी ७२००० हजारावर होता. व आज सकाळी ७३५०० रुपयांवर पोहोचला. एकच दिवसात चांदीत १५०० रुपयांची तर सोन्यात ४०० ते ५०० रुपयाची वाढ दिसून आली. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाचा हा अखेरचा महिना असून मार्चमध्ये सोने आणि चांदीत कमाल उसळी येईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला होता. तो अखेर खरा ठरताना दिसत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील भाव
दरम्यान, सोमवारी विक्रमी दरांवर झेप घेतल्यानंतर आज सोन्याचे फ्युचर्स घसरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा एप्रिल वायदा १३१ रुपयांनी घसरून ६४,३३१ रुपयांवर उघडला. तर व्यवहार दरम्यान दिवसभरातील उच्चांक ६४,३८८ रुपये आणि नीचांक ६४,३३१ रुपयांवर पोहोचला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---