सोमवार, डिसेंबर 11, 2023

चढ-उतार सुरूच! आज काय आहे सोने-चांदीचा दर??

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । सोन्यासह चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच असून मागील दोन चार दिवसाच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. तर सोन्याच्या किंमती रेकॉर्डस्तरावर दणकावून आपटल्या आहेत गेल्या दोन महिन्यात सोन्यात मोठी उसळी आली नाही. 

जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 53, 680 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 58,600 रुपये आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव 58700 रुपयावर होता. त्यात किंचित 100 रुपयाची घसरण झालेली दिसून येतंय दरम्यान दुसरीकडे सध्या चांदीचा दर 70,200 रुपयावर आहे. चांदीच्या किमती देखील 100 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. यापूर्वी दोन महिण्यापुर्वी म्हणजेच 5 मे रोजी सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी 62 हजाराचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने देखील विनाजीएसटी 77 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला होता. मात्र मे च्या पंधरवडापासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण होताना दिसून आलीय. दरम्यान, उच्चांकापासून सोने अद्यापही 3200 ते 3400 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर चांदीचा तब्बल 7500 ते 8000 हजार रुपयाने घसरली आहे.

गुडरिटर्न्सनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील किमती
दरम्यान, दुसरीकडे गुडरिटर्न्सनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, सोमवारी, 3 जुलै रोजी सोने उतरले. महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 जुलै रोजी सोने महागले होते.30 जून आणि जुलै महिन्याच्या पहिली तारीख अशा दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. तर सोमवारी, 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी उतरले. भाव प्रति 10 ग्रॅम 58800 रुपये झाला.