जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । मागील दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज रविवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. जळगावातील सुवर्णबाजारात आज सोन्याच्या भावात प्रति १० ग्रम १५० रुपयाची वाढ झाली तर चांदीचा दरात ११०० रुपयांची वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यापासूनच सोने-चांदीचे भाव वाढत आले. मात्र, मागील गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोने चांदीच्या दरात वाढ झाली.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४३ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७०८ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,०८० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
तर चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या आज ११०० रुपायाची वाढ होऊन ते प्रति १ किलो ७७,२०० रुपये इतका आहे.