जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । जळगाव सराफा बाजारात आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत आज जोरदार वाढ झाली. आज सोन्याच्या प्रति १० दरात तब्बल ७२० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति एक किलोच्या दरात १८५० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर होता तर चांदी प्रति किलो ३५० रुपयाने वाढली होती.
नाणेनिधीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताच्या वृद्धीमध्ये अडथळा निर्माण झाला असून विकासदराचा अंदाज कमी केला. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळाला आहे. यामुळे भारतात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झालीय.
गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात हालचाली दिसून आल्या. या आठवड्याचा विचार केल्यास गेल्या ५ दिवसात सोन्याच्या किंमतींत दोन वेळा घसरण तर दोन वेळा वाढ झालीय. तर काल सोने स्थिर होते. दोन दिवसात सोने ८४० रुपयाने महागले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. चांदीच्या दराचा विचार करता गेल्या महिन्यापासून त्यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही ७० हजाराच्या वर होते. ते पुन्हा आता ७० हजारांच्या दिशेने जाऊ लागले आहे.
आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,९४१ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४१० रुपये इतका आहे.
आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६९,८०० रुपये इतका आहे.