⁠ 
रविवार, मे 19, 2024

रक्षा बंधनाच्या दिवशी सोने-चांदी भावात मोठी उसळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२३। रक्षा बंधनाच्या दिवशी सोने-चांदी भावात मोठी उसळी घेतली आहे. जागतिक बाजारात अनुकूलता नसल्याने गुंतवणूकदार संस्था सोन्याकडे अजूनही पूर्णपणे वळल्या नाहीत. भारतीय बाजारात पण सोन्यासह चांदीने चांगलीच उसळी घेतली. ऑगस्ट महिन्यात मोठा ब्रेक घेतल्यानंतर अखेरच्या टप्प्यात सोने-चांदीने दरवाढीचा झेंडा फडकावला आहे. Gold Silver Rate Today

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याने तडाखेबंद खेळी केली आहे. महिन्याच्या सुरुवातीला 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर ब्रेक घेतला. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 28 ऑगस्ट रोजी सोन्यात 50 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेट सोने 54,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

24 कॅरेट सोने 58,869 रुपये, 23 कॅरेट 58,633 रुपये, 22 कॅरेट सोने 53,924 रुपये, 18 कॅरेट 44152 रुपये, 14 कॅरेट सोने 34,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,781रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.