---Advertisement---
वाणिज्य

होळीपूर्वी सोने – चांदी पुन्हा महागली ; पहा आजचा 10 ग्रॅमचा भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२३ । रंगांचा सण असलेल्या होळीची चमक आता बाजारपेठेत दिसू लागली आहे. होळीपूर्वी सोने आणि चांदी पुन्हा महाग होताना दिसून येतेय. मागील काही सत्रात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आज ग्राहकांना सोनं खरेदी करणं महाग पडू शकतं. कारण आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 वाजेपर्यंत सोने 0.15 टक्क्यांनी वाढले आहे. सोबतच चांदी 0.61 टक्क्यांनी महागली आहे.

gold silver 2 jpg webp webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आलीय. आज सोन्याच्या किमतीत 85 रुपयाची वाढ दिसून आली. त्यामुळे सोने 55,825 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत 392 रुपयाची वाढ झालेली असून चांदी 64,426 प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

---Advertisement---

देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीने अडीच वर्षातील रेकॉर्ड मोडीत काढला होता. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा दर GST सह 59 हजारांवर गेला होता. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र महिन्याभरात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. उच्च पातळीपासून सोने जवळपास 3000 हजार रुपयांनी घसरले आहे.

जळगावातील सोने चांदीचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदी 66,000 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, जळगावात उच्च पातळीपासून गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात जवळपास 3 हजार 500 हजार रुपयांची (GST सह) घसरण झाली आहे

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---