जळगाव लाईव्ह न्यूज । 3 फेब्रुवारी 2024 । बजेटपूर्वी आणि नंतर सोने-चांदीने कमाल दाखवली. दोन्ही धातूंमध्ये चढउताराचे सत्र सुरु आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात दरवाढीने झाली असून गेल्या दोन दिवसात सोने दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीने पण मोठा पल्ला गाठला. सोन्याचा भाव पुन्हा उच्चांकीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात दर वाढत असल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना झळ सोसावी लागत आहे Gold Silver Rate 3 February 2024
गेल्यावर्षी दिवाळीनंतर आणि डिसेंबर महिन्यात सोन्याने सर्व उच्चांक मोडीत काढले. त्यावेळीस सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६४ हजार रुपयावर गेला होता. मात्र जानेवारी महिन्यात सोन्यात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. गेल्या महिन्यात सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्यात दरवाढ दिसली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ही दरवाढ कायम होती. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी महागले. तर 2 फेब्रुवारी रोजी किंमतीत 160 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दुसरीकडे जानेवारी महिन्यात ग्राहकांची चांदी झाली. 4400 रुपयांची घसरण दिसून आली. पण अखेरच्या आठवड्यात चांदीने 2 हजार रुपयांची उसळी घेतली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला किंमतीत चढउतार दिसून आला. 1 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. तर 2 फेब्रुवारी रोजी तेवढीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.