⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

ग्राहकांना झटका! सोन्याने ओलांडला 65000 टप्पा, चांदीही 80 हजाराच्या उंबरठ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येतो. त्यानुसार मागील काही काळात सोने-चांदीने (Gold Silver Rate) मोठी भरारी घेतली आहे. सोन्यासह चांदी नवनवीन रेकॉर्ड मोडीत काढत आहे. यातच देशभरात लग्नसराईला सुरुवात झाली असून मात्र शनिवारी सोने-चांदीला पुन्हा झळाळी आली. सोन्याने जीएसटीसह ६५ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे तर चांदी ८० हजाराच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे लग्नसराईत दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. Gold Silver Rate 3 December 2023

शनिवारी सराफा बाजारात प्रतितोळ्यामागे सोन्याच्या भावात ६०४ रुपयांची वाढ होत भाव उच्चांकी ६५,७०० (जीएसटीसह) रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीच्या भावातही ५५१५ रुपयांची वाढ होऊन चांदीचा एक किलोचा दर जीएसटीसह ७९,८२५ वर पाेहाेचली. दरम्यान, येत्या जानेवारीत सोने ६७ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज जानकरांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेने तिमाहीतील बेरोजगारीचा डेटा प्रसिद्ध केला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीतून पैसा काढून घेतला. शिवाय सोन्यात नैसर्गिक वाढ झाल्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर ऑल टाइम उच्चांकावर पोहोचले आहेत. युक्रेन आणि रशिया युद्धानंतर सहा हजार रुपयांची तेजी पकडलेल्या सोन्याच्या भावात तेजी कायम होती. दिवाळीत साेने ६४ हजारांचा टप्पा ओलांडणार असा अंदाज जाणकारांनी आधीच व्यक्त केला होता. ती दरवाढ आधीच होत असून जानेवारीत सोन्याचे भाव ६७ हजारांपार जातील, असेही संकेत मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

यंदा दिवाळीत १६ नाेव्हेंबर राेजी साेन्याचे प्रतिताेळ्याचे दर ६२,८३० हाेते. ते शनिवारी (दि. २ डिसेंबर) ६५,७०० (जीएसटीसह) वर गेलेत. ज्यांनी ताेळाभर साेने दिवाळीला खरेदी केले असेल त्यांच्याकडील साेन्याच्या मूल्यात २८७० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही ५५१५ रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी ७९,३१० रुपये किलाे असणारी चांदी शनिवारी ७९,८२५ वर पाेहाेचली. चांदीतील दरवाढ ही चीनने औद्याेगिक वापरासाठी मागणी केलेल्या वाढीचा परिणाम असल्याचे सांगण्यात अाले.