⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 9, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदी खरेदीदारांना सुवर्णसंधी ; भाव दणकावून आपटले

सोने-चांदी खरेदीदारांना सुवर्णसंधी ; भाव दणकावून आपटले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । जुलैमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. पण पण दोन्ही धातूंना विक्रमाला गवसणी घालता आली नाही. मे आणि जून नंतर जुलै महिन्यात पण सोने-चांदीला नवीन रेकॉर्ड करता आला नाही. कालच्या बाजार भावापेक्षा आज सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे. सोबतच चांदीचाही दर घसरलेला दिसून येत आहे.

जळगावातील आजचे दर काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५४,७५० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,९०० रुपयावर होता. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,७०० रुपयावर आहे. काल सोन्याचा दर ६०००० रुपयावर होता. त्यात २०० ते ३०० रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव सध्या विनाजीएसटी ७४००० रुपयापर्यंत आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात जून अखेरीस सोन्याचा दर घसरून ५९ हजाराखाली आला होता. तर चांदीचा दर देखील ७० हजारावर आला होता. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झालेली पहायला मिळाली. परंतु २१ जुलैपासून भावात घसरण झाली. जुलैच्या शेवटी सोन्यात जवळपास १४०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीत २००० ते २३०० रुपयांची पडझड झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भाव वधारला होता. सोने १५० रुपयांनी तर चांदीने १००० रुपयांची दरवाढ झाली होती. अमेरिकन बाजारात डॉलर मजबूत झाला. त्याचा परिणाम दिसून आला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील (MCX) दर?
कमोडिटी एक्सचेंवर बाजाराच्या सुरुवातीलाच सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) किंचित घसरून ५९ हजार १०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे ४९० रुपयांनी घसरून ७२ हजार ४७१ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.